RMEA च्या सभासदांनी अनुभवले राजगड ट्रेक चे अविस्मरणीय क्षण

राजगड म्हटलं की आठवते ती स्वराज्याची पहिली राजधानी आणि स्वराज्याची उंची.  दिनांक ११ - १२ नोव्हेंबर या दिवशी RMEA च्या सभासदांची राजगड ट्रेकिंग मोहीम पूर्णत्वास आली. दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सोलापूर मधून निघाल्यानंतर प्रवासात सर्व सभासदांचे व्यवसायिक माहिती देवाणघेवाण सत्र अतिशय सुंदर रित्या पार पडले, त्यानंतर प्रवासातच वाटेवर असणाऱ्या माननीय रोहन देशमुख यांच्या फार्म हाऊस वरती सर्व सभासदांच्या नाश्त्याची उत्तम सोय करण्यात आली होती. एकंदरीत सर्व सभासदांचा 11 नोव्हेंबर चा दिवस खूप मजेत, हसत-खेळत ,आणि व्यावसायिक चर्चा या वरती पार पडला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ नोव्हेंबर सकाळी ६ वाजता सर्वांनी ट्रेकिंग साठी राजगडाच्या पायथ्याकडे बस ने प्रस्थान केले व तेथून ट्रेकिंगला सुरुवात झाली. राजगड वर चढत असताना राजगडावरील सूर्योदयाचा क्षण सर्व सभासदांनी अनुभवला. व अशाप्रकारे अतिशय अवघड अशी ट्रेकिंग पूर्णत्वास आली.एकंदरीत या ट्रेकिंग मध्ये सर्व सभासदांची व त्यांच्या व्यवसायांची माहिती एकमेकांपर्यंत पोहोचली.